Pandharpur News : धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन

Pandharpur News : धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन

| Updated on: Jul 07, 2025 | 4:02 PM

पंढरपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात देशभरातील भाविकांनी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या पवित्र प्रसंगी पंढरी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद लुटला. मात्र, या उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.

आषाढी वारीच्या समारोपादरम्यान कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडली. घरगुती वादातून पत्नीने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले, तर पतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आसबे कुटुंबातील या चारही सदस्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास तालुका पोलीस करत आहेत.

Published on: Jul 07, 2025 04:02 PM