Air India Plane Crash : मुलीला सरप्राईज द्यायचं होतं पण… लंडनला जाणाऱ्या विमानातील पांड्या दाम्पत्याचा ‘तो’ सेल्फी शेवटचा
अहमदाबाद येथे झालेला अपघात एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानाचा होता, जे अहमदाबादहून लंडनला जात होते. हे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले. विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.
मुलीला सरप्राईज देण्यासाठी जाणाऱ्या आई- वडिलांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुलीच्या दीक्षांत समारंभाला आई-वडिल उपस्थित राहणार होते. मात्र मुलीकडे पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अहमदाबाद विमातळावरून लंडनला जाणाऱ्या पांड्या दाम्पत्याचा या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीसह नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता पांड्या दाम्पत्य हे लंडनला जाण्यासाठी निघाले होते. मात्र एअर इंडियाच्या विमान अपघात दुर्घटनेत हे दोघेही मृत पावले. पांड्या दाम्पत्यांनी विमानात काढलेला सेल्फी आपल्या मुलाला पाठवला आणि तोच फोटो शेवटचा ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Jun 13, 2025 02:52 PM
