PM Narendra Modi : नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; जवानांच्या शौर्याचं मोदींकडून कौतुक
अदमपूर एअर बेस येथे आज पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हवाई दलाच्या जवानांचं कौतुक केलं आहे.
भारत माता की जय, ही फक्त घोषणा नाही आहे. ही देशाच्या त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो भारत मातेच्या मान, मर्यादेसाठी आपल्या जिवावर उदार व्हायला तयार आहे. नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा बनला आहात. विरांच्या धरतीवरून नेव्ही, आर्म फोर्स आणि हवाई दलाच्या सर्व जवानांना सॅल्यूट करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या हवाई दलातील जवानांचं कौतुक केलं आहे. अदमपूर एअर बेस येथे आज पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन जवानांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, तुमच्या पराक्रमामुळे आज ऑपरेशन सिंदूरचा आवाज प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमत आहे. या ऑपरेश दरम्यान प्रत्येक भारतीय तुमच्या सोबत होता. प्रत्येक भारतीयांची प्रार्थना तुमच्या सोबत होती. आज प्रत्येक देशवासी आपल्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञ आहे. त्यांचा ऋणी आहे. ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य मोहीम नाहीये. ही भारताची नीती, नियत आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. भारताची बुद्धाची भूमी आहे. तर गुरू गोविंद सिंगांचीही धरती आहे. सव्वा लाख से एक लगाम, असं गुरुगोविंद सिंग म्हणाले होते, असंही यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
