PM Narendra Modi : दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
PM Narendra Modi Visit Deekshabhoomi : नागपूर दौऱ्यात आज पंतप्रधानांनी दिक्षाभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना वंदन केलं.
पंतप्रधान मोदींनी रविवारी नागपूर दौरा केला. यावेळी त्यांनी आरएसएसच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर ते दीक्षाभूमीवर दाखल झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीवर पोहोचून गौतम बुद्धांची पूजा केली. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना वंदन केलंय. देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहे. दिक्षाभूमीला वंदन केल्यानंतर तेथील अभिप्राय वहीत आपला अभिप्राय देत विशेष संदेश दिला आहे. स्मृती भवन भरातीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनशक्तिला या त्रिसूत्री समर्पित असलेले स्थान असल्याचे गौरवाद्गार पंतप्रधानांनी काढले आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
Published on: Mar 30, 2025 12:30 PM
