Pratap Sarnaik : अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी; आंदोलनातून सरनाईकांचा काढता पाय

Pratap Sarnaik : अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी; आंदोलनातून सरनाईकांचा काढता पाय

| Updated on: Jul 08, 2025 | 1:54 PM

Mira Bhayandar MNS Morcha LIVE : शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनसेच्या मोर्चाला पाठिंबा दिला असला तरी आंदोलकांनी मात्र त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली दिसून येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) च्या मीरा-भाईंदरमधील येथील नियोजित मोर्चाच्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक हे दाखल झालेले आहेत. सरनाईक यांनी या संपूर्ण प्रकरणात मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला होता. तसंच पोलिसांची दादागिरी खपवून घेणार नाही म्हणत या मोर्चात आपणही सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मंत्री सरनाईक हे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेले असताना आंदोलकांकडून मात्र त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी आंदोलकांनी ‘सरनाईक गो बॅक’ अशा घोषणा देत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मात्र सरनाईक यांना या मोर्चाच्या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला आहे.

शांतते सुरू असलेल्या मोर्चात प्रताप सरनाईक दाखल होताच काहीसा गोंधळ बघायला मिळाला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू करत प्रताप सरनाईक निघून जाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे या मोर्चाच्या ठिकानाहून सरनाईक लागलीच निघालेले दिसले.

Published on: Jul 08, 2025 01:54 PM