मुंबईत चहाप्रेमींच्या खिशाला कात्री, चहा, कॉफीमध्ये दरवाढ

मुंबईत चहाप्रेमींच्या खिशाला कात्री, चहा, कॉफीमध्ये दरवाढ

| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 11:36 AM

चहाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईत चहाप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे. चहा आणि कॉफीच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चहाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईत चहाप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे. चहा आणि कॉफीच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता चहा पाच रुपयांऐवजी सात रुपयांना तर कॉफी दहा रुपयांऐवजी बारा रुपयांना मिळणार आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. चहा पावडर, साखर, कॉफी, दूध अशा सर्वच पदार्थांचे दर वाढल्याने भाव वाढ करण्यात आल्याची प्रतिक्रिया हॉटेल चालकांनी दिली आहे.