Pune News : ठाकरे काका-पुतण्याचा वाढदिवस; शुभेच्छांचे एकत्रित बॅनर झळकले
राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकत्रित बॅनर पुण्यात बघायला मिळाले आहेत.
पुण्यात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले आहेत. शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्रित शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शिवसैनिकांकडून ही बॅनरबाजी केली जाते आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या युतीच्या चर्चेने उत्साह वाढला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर या आधी देखील बॅनरबाजी केली गेली होती. शिवसैनिकांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा दिल्याचे बॅनर सध्या पुण्यात बघायला मिळाले आहेत. त्यामुळे आता पुण्यात शिवसैनिकांकडून थेट ठाकरे काका-पुतण्याच्या वाढदिवसाचे बॅनर एकत्रितपणे झळकल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
