Pune Crime : कुरिअर बॉय बनून ‘तो’ घरात घुसला, लैंगिक अत्याचार केले अन् ‘मी पुन्हा येईन’चा म्हणाला

Pune Crime : कुरिअर बॉय बनून ‘तो’ घरात घुसला, लैंगिक अत्याचार केले अन् ‘मी पुन्हा येईन’चा म्हणाला

| Updated on: Jul 04, 2025 | 10:59 AM

पुणे पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेनं हादरलंय. त्यामुळे आता लोक कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारू लागलेत. पुण्यातल्या कोंढवा भागातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेल्या प्रकारानं पोलीस सुद्धा अवाक् झालेत.

पुणे पुन्हा एकदा एका भयावह घटनेने हादरलंय. कुरिअर बॉयच्या नावाने एक तरुण कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत शिरला. एका तरुणीच्या दारावर पोहोचून तुमचं कुरिअर आल्याचं या तरुणानं सांगितलं. संबंधित तरुणीने मी कोणतेही कुरिअर मागितलं नसल्याचं सांगून सुद्धा या तरुणानं तुम्ही फक्त सही करा म्हणून आग्रह धरला. मुलीनं दरवाज्याचं सेफ्टी डोअर उघडताच या तरुणानं तिच्या डोळ्यावर केमिकल स्प्रे फवारला. स्प्रेमुळे ही तरुणी बेशुद्ध होऊन पडली आणि त्याचा फायदा घेत या नराधमानं तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर या आरोपीने तरुणीचाच मोबाईल घेऊन स्वतःचा एक सेल्फी काढलाय आणि त्यापुढे मी पुन्हा येईन असं लिहून तो तिथून फरार झालाय. पीडित तरुणी मुळात अकोलेची असून पुण्यातल्या एका बड्या कंपनीत कामास आहे. याआधी खरंतर अनेक घटनांनी पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उभे राहिलेले असतानाच या घटनेची त्यात आता भर पडली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 04, 2025 10:59 AM