Pune Crime News : स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pune Crime News : स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

| Updated on: Mar 12, 2025 | 6:27 PM

Swargate Rape Case Updates : पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाहीमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्ता गाडे याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं हॉट. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी घोषित करण्यात आली आहे.

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. स्वारगेट बसस्थानकात एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता. त्यानंतर या प्रकरणाने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा 3 दिवस फरार होता. त्यानंतर त्याच्या गावातून त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिस करत आहे. आज दत्तात्रय गाडे याची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. यावेळी त्याला अजून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

Published on: Mar 12, 2025 06:27 PM