राणा दाम्पत्यानं अभिवादन केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण

| Updated on: May 29, 2022 | 2:17 PM

याच ठिकाणी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते  सकाळी 11 वाजता शुद्धीकरण करणार आहे. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे.

Follow us on

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) दाम्पत्याने काल अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. याच ठिकाणी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते  सकाळी 11 वाजता शुद्धीकरण करणार आहे. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने संविधान म्हणून दाखवावे, अशी मागणी भीम ब्रिगेडने केली होती. नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या’ घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. दरम्यान, इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे.