Rahul Solapurkar Video: ‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे…’, शिवरायांनंतर आता बाबासाहेबांबद्दल सोलापूरकर पुन्हा बरळला

Rahul Solapurkar Video: ‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे…’, शिवरायांनंतर आता बाबासाहेबांबद्दल सोलापूरकर पुन्हा बरळला

| Updated on: Feb 09, 2025 | 5:26 PM

औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरने आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य करून पुन्हा एका स्वतःला टीकेचा धनी बनवलं आहे.

गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने अभिनेता राहुल सोलापूरकरवर चांगलीच टीका करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरने आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य करून पुन्हा एका स्वतःला टीकेचा धनी बनवलं आहे. वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं वक्तव्य करत राहुल सोलापूरकर याने नवा जावई शोध लावला आहे. सोलापूरकर याने नवं वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे.

‘रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भिमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं राहुल सोलापूरकर म्हणाला. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट करत ‘राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. याला दिसेल तिथे तुडवा’, असं आव्हाड म्हणाले.

Published on: Feb 09, 2025 05:24 PM