राजकारणात प्रवेश कसा झाला?, Aditi Tatkare यांनी सांगितलं गुपित; वाचा राजकीय प्रवासाची चित्तरकथा!

राजकारणात प्रवेश कसा झाला?, Aditi Tatkare यांनी सांगितलं गुपित; वाचा राजकीय प्रवासाची चित्तरकथा!

| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 4:03 PM

राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो, तौक्ते वादळ असो की काल परवा आलेला महाड-चिपळूणमधील पूर असो.

राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या राजकारणात स्थिरावल्या आहेत. अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो, तौक्ते वादळ असो की काल परवा आलेला महाड-चिपळूणमधील पूर असो. प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. त्यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून आदिती तटकरे यांची चर्चा आहे. आदिती तटकरे नेमक्या कोण आहेत? त्या राजकारणात कशा आल्या? याचा घेतलेला हा आढावा.