Mumbai Rain : सॅल्यूट… स्कुल व्हॅन अडकली, भरपाण्यातून चिमुकल्यांना असं वाचवलं, बघा कर्तव्य दक्ष पोलिसांचा VIDEO

Mumbai Rain : सॅल्यूट… स्कुल व्हॅन अडकली, भरपाण्यातून चिमुकल्यांना असं वाचवलं, बघा कर्तव्य दक्ष पोलिसांचा VIDEO

| Updated on: Aug 18, 2025 | 1:35 PM

मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात पुराच्या पाण्यात एक स्कूल व्हॅन अडकली होती. सुदैवाने, पोलिसांनी तात्काळ मदत करून व्हॅनमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले.

मुंबईतील दादर, कुर्ला, चेंबूर या भागांसग सायन्स किंग्ज सर्कल पाण्याने भरलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहे. पावसाचे पाणी रस्त्यात भरल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली आहे. भर पावसात पावसाचं पाणी रस्त्यात भरल्याने वाहन रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे वाहन चालकांसह विद्यार्थी आणि नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेत. अशातच मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात पुराच्या पाण्यात एक स्कूल व्हॅन अडकल्याचे पाहायला मिळाले. या स्कुल व्हॅनमध्ये शाळेचे लहानगे विद्यार्थी असून पावसामुळे साचलेल्या पाण्यात ही स्कुल व्हॅन अडकून पडली. बराच वेळ ही बस अडकून पडल्याने विद्यार्थी आपली सुटका कशी होईल, या चिंतेत असताना सुदैवाने, मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत विद्यार्थ्यांना तात्काळ मदतीचा हात दिला, एक एक करून व्हॅनमध्ये अडकून पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांनी खांद्यावर घेतलं तर कुणाचा हात धरत सुरक्षित जागी नेत त्यांना बाहेर काढले.

Published on: Aug 18, 2025 01:28 PM