Raj Thackeray | जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या… राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?
रेल्वे कामगार संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी रेल्वे भरती आंदोलनाचा इतिहास आणि मराठी तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली.

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात रेल्वे भरती होत असताना त्याच्या जाहिराती राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नव्हत्या. त्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जात होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीच्या संधींबाबत माहितीच मिळत नव्हती.
या मुद्द्यावरून आंदोलनाची सुरुवात झाली आणि हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलनादरम्यान अनेक अडचणी आणि विरोधालाही सामोरे जावे लागले, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मंत्री असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या काळात ही परिस्थिती होती, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना आपलं म्हणणं समजलं. मोबाईल सेवांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढण्यामागेही मनसेच्या आंदोलनांचा मोठा वाटा असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.