Raju Shetti | भ्रष्टाचार करुन भाजपत येत पवित्र झालेल्यांचं काय? राजू शेट्टींचा सवाल

Raju Shetti | भ्रष्टाचार करुन भाजपत येत पवित्र झालेल्यांचं काय? राजू शेट्टींचा सवाल

| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 9:49 AM

मुंबई बँक घोटाळा आणि देशातील इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सोमय्या का बोलत नाहीत, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. विशिष्ट हेतू ठेवून इतरांना बदनाम का करताय, असाही सवाल त्यांनी सोमय्यांना केलाय. भ्रष्टाचार करुन भारतीय जनता पार्टीत येत पवित्र झालेल्यांच काय?

मुंबई बँक घोटाळा आणि देशातील इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सोमय्या का बोलत नाहीत, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. विशिष्ट हेतू ठेवून इतरांना बदनाम का करताय, असाही सवाल त्यांनी सोमय्यांना केलाय. भ्रष्टाचार करुन भारतीय जनता पार्टीत येत पवित्र झालेल्यांच काय? भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच मग तो कोणत्याही पार्टीने किंवा अधिकाऱ्याने केलेला असो, भ्रष्टाचार करताना चाबकाचे फटके मारत रस्त्यावर आणलं पाहिजे, असं रोकठोक मत शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.