रत्नागिरीत आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव, 25 हजारांचा भाव
अमृत मँगोजने बागेतच आ योजित केलेल्या लिलावात मुहूर्ताची सहा डझनची पेटी 25 हजार रुपयांना उरणचे उद्योजक कर्नल आशुतोष काळे यांनी खरेदी केली.
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आंब्यांची पहिली पेटी विक्रीला काढण्यात आली. अमृत मँगोजने बागेतच आ योजित केलेल्या लिलावात मुहूर्ताची सहा डझनची पेटी 25 हजार रुपयांना उरणचे उद्योजक कर्नल आशुतोष काळे यांनी खरेदी केली.
पावस येथील आंबा बागेत अभिजित पाटील यांच्या अमृत मँगोजतर्फे ही लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. त्यात मुंबईसह पुणे, इचलकरंजीमधील सहा व्यावसायिक कंपन्या व उद्योजक सहभागी झाले होते. लिलाव प्रक्रिया चालू करण्यापूर्वी पेटीचे पूजन श्री. पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले.
