Mumbai Doctors Strike | सायन रुग्णालयाबाहेर विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचा संप
मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आज सायन रुग्णालयाबाहेर विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले. (Resident doctors strike outside Sion Hospital)
मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आज सायन रुग्णालयाबाहेर विविध मागण्यांसाठी निवासी आंदोलन केले. दर्मयान, राज्यातील वैद्यकीय महिविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी कोविड महामारीच्या काळात महत्वपूर्ण सेवा बजावली असल्याने त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांच्या संपात तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा प्रदेश वैद्यकीय आघडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील या निवासी डॉक्टरांनी कोरोनाकाळात बजावलेल्या सेवेची पावती म्हणून त्या काळातील त्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते, असे मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे आहे.
