पुण्यातील रिक्षा चालकांचे मुख्यमंत्र्याना पत्र लिहून साकडे

| Updated on: Jul 25, 2022 | 7:04 PM

पेट्रोल आणि डिझेलचा टॅक्स कमी केला तसाच सीएनजीचा सुद्धा टॅक्स कमी करावा अशी मागणी देखील या रिक्षा चालकांनी पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करत केली आहे.

Follow us on

पुणे- पुण्यात रिक्षा चालकांकडून अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन (Dharane andolan)करण्यात आले आहे. त्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी थेट राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साकडं घातलं आहे. बेकायदेशीर टॅक्सी (Taxi)बंद कराव्यात, पुण्यातील रिक्षांशी मीटर वाढ ही खटवा समितीच्या नियमाप्रमाणे व्हावी अशी देखील मागणी या आंदोलनकर्त्यांनी (Andolan)केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा टॅक्स कमी केला तसाच सीएनजीचा सुद्धा टॅक्स कमी करावा अशी मागणी देखील या रिक्षा चालकांनी पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करत केली आहे.