कदमांच्या पोराची सुरू आहे छ्म् छ्म्..; हनीट्रॅपवर खडसेंची कवितेतून टोलेबाजी
हनीट्रॅपचा मुद्दा आता रोहिणी खडसे यांनी हाती घेतला असून सत्ताधाऱ्यांवर कवितेतून टीका केली आहे.
हनीट्रॅपच्या मुद्द्यावर रोहिणी खडसे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. रोहिणी खडसे यांनी कवितेतून सत्ताधारी पक्षातील महिलांना टोला लगावला आहे. मेकअप क्वीनने बोलणं देखील टाळलं आहे, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.
रोहिणी खडसे यांनी आता हनीट्रॅपचा मुद्दा हाती घेतला आहे. यावर त्यांनी कविता केली असून सत्ताधारी महिलांना धारेवर धरलं आहे. कवितेत खडसे यांनी म्हंटलं की, शरमेने खाली घातली महाराष्ट्राची मान, हनीट्रॅपच्या नादी लागून इज्जत ठेवली गहाण. भाजपचे मंत्री-संत्री सगळेच अडकलेत, अब्रूचे धिंडवडे चहूबाजूंनी काढलेत. कदमांच्या पोराची जोरात सुरू आहे छ्म् छ्म्, दिवस आशांचेच! कोण देईल यांना दम? चिऊताई मात्र आता काढत नाही आवाज, कोणास ठाऊक कुठे लपून बसली आहे आज.. मेकअप क्वीनने तर बोलणेही टाळले, उगाच आपल्या गोष्टी बाहेर काढतील, बहुतेक तिला कळले! अशा शब्दांत खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
