Operation Sindoor : रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
Operation Sindoor Updates : भारताच्या एअरस्ट्राईकला रशियाचा पाठिंबा मिळाला आहे. फ्रान्सने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारताच्या एअरस्ट्राईकला रशियाचा पाठिंबा मिळाला आहे. आम्हाला भारत-पाकिस्तान तणावाची चिंता आहे, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाकारोवा यांनी म्हंटलं आहे. रशियाकडून दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. दरम्यान, दहशतवादाच्या संकटापासून स्वत:चं रक्षण करण्याची भारताची इच्छा प्रत्येकाला समजते, आम्हाला समजते, असं फ्रान्सचं म्हणण आहे. तणाव वाढू नये यासाठी दोन्ही देशांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: May 07, 2025 07:28 PM
