दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद का दिलं नाही? ‘या’ नेत्यानं केला दावा

दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद का दिलं नाही? ‘या’ नेत्यानं केला दावा

| Updated on: Nov 06, 2023 | 10:13 AM

माझ्या देखतच अजितदादांनी मुख्यमंत्री हवं ही एकच शेवटची इच्छा.. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार या माध्यमांशी बोलताना अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. यावेळी केसरकरांनी शेलकी टीका केली होती.

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार या माध्यमांशी बोलताना अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, माझ्या देखतच अजितदादांनी मुख्यमंत्री हवं ही एकच शेवटची इच्छा.. परंतु यावर राज्यातील विविध नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी शेलक्या शब्दात टीका केली होती. दीपक केसरकर म्हणाले की, अजित दादांचे वय लहान आहे त्यांना पुढच्या काळात ही संधी मिळू शकते. यावर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मोठा दावा केला आहे. सचिन खरात म्हणाले, दीपक केसरकर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तुमचंच वय लहान असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मंत्री केलं नाही ही कृपया ध्यानात ठेवा, असे म्हणत त्यांनी खोचक टीका केली आहे.

Published on: Nov 06, 2023 10:11 AM