पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ
निवडणुकीच्या रणधूमाळीत छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगर येथील बेगमपुरा भागात असलेल्या मतदारांच्या नावाची यादी पैसे देण्याआधीच व्हायरल करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या रणधूमाळीत छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगर येथील बेगमपुरा भागात असलेल्या मतदारांच्या नावाची यादी पैसे देण्याआधीच व्हायरल करण्यात आली आहे. ही यादी समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील बेगमपुरा परिसरात मतदारांना पैसे वाटप करण्यापूर्वीच एक वादग्रस्त यादी व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या यादीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माहितीनुसार, ही यादी एका राजकीय पक्षाकडून मतदारांना पैसे देण्यासाठी तयार करण्यात आली होती, मात्र ती स्थानिकांच्या हाती लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.
स्थानिक कार्यकर्त्यांनी या व्हायरल झालेल्या यादीचे बॅनर तयार करून ते सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. या यादीत बेगमपुरा भागातील कहार समाजाच्या अनेक रहिवाशांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यादीत अनेक मृत व्यक्तींची नावे देखील समाविष्ट आहेत, ज्यांचे निधन होऊन अनेक वर्षे झाली आहेत. यादीत नाव असलेल्या अनेक मतदारांनी आपल्याला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले असून, आपली परवानगी न घेताच नावे समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ काही नागरिकांनी येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
