मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभर प्रवास करावा म्हणजे सगळे रस्ते गुळगुळीत होतील

मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभर प्रवास करावा म्हणजे सगळे रस्ते गुळगुळीत होतील

| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 10:25 AM

मुख्यमंत्री विधिमंडळ अधिवेशनात येणार का, याच चर्चेवरून कालचा दिवस गाजला. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आपला चार्ज रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असा अनाहूत सल्ला दिला.

मुख्यमंत्री विधिमंडळ अधिवेशनात येणार का, याच चर्चेवरून कालचा दिवस गाजला. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आपला चार्ज रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असा अनाहूत सल्ला दिला. त्यावरून दिवसभर भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला. आता अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री येणार असल्यावरूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. मुख्यंमंत्री विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले. आता उद्धव ठाकरे यांनी राज्यभर प्रवास करावा. त्यामुळे तिथलेही रस्ते गुळगुळीत होतील, असा टोला त्यांनी हाणला आहे.