तर मला नावातला बापू काढून टाकावा लागेल! संग्रामबापू भंडारेंचा नवा व्हिडीओ…
संग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना एका व्हिडीओद्वारे कडक इशारा दिला आहे.
संग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना एका व्हिडीओद्वारे कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, “माझी गाडी फोडायची असेल तर फोडा, पण जर कोणत्याही धर्म प्रचारकावर हल्ला झाला, तर मला संग्रामबापू भंडारे यातील ‘बापू’ हा शब्द काढून फक्त संग्राम भंडारे व्हावे लागेल.”
संग्रामबापू यांनी आपल्या नव्या व्हिडीओत बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा एक व्हिडीओ समाविष्ट केला आहे. त्यांच्या मते, थोरात यांनी आपल्यावर झालेल्या कथित हल्ल्याचे समर्थन केल्याने आळंदी येथे लोक “महाराजांच्या गाड्या फोडा” अशी भाषा वापरू लागले आहेत. या आरोपांमुळे बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या समर्थकांवर संग्रामबापू यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
Published on: Aug 24, 2025 12:24 PM