Sanjay Raut : ‘सरकार मोदी की, सिस्टिम राहुल गांधीकी’, संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut Press Conference : जातनिहाय जनगणनेच्या सरकारच्या निर्णयावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारचा असला तरी त्याचे श्रेय राहुल गांधी यांचेच असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या भूमिके पुढे सरकारला गुडघे टेकावे लागले, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यावर आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केलं.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘जिसकी जात का पता नही, हो जाती जनगणनेकी की बात कर रहे है’ अशा घाणेरड्या शब्दात अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या मागणीवर टीका करण्यात आली होती. मात्र आता केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करतो आणि राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो असं म्हणत ‘सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी’ अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
