VIDEO : विरोधकाकडे टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही, Sanjay Raut यांचा BJP वर निशाणा

VIDEO : विरोधकाकडे टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही, Sanjay Raut यांचा BJP वर निशाणा

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 12:23 PM

मागच्यावेळी सांगलीत पूर आला होता. त्याच्यापेक्षा पूरग्रस्तांना आता लवकर मदत मिळाली आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज्यातील पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मागच्यावेळी सांगलीत पूर आला होता. त्याच्यापेक्षा पूरग्रस्तांना आता लवकर मदत मिळाली आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. नैसर्गिक संकट असलं तरी सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. नियंत्रण ठेवणं सरकारचं काम आहे. ते काम सरकार करत आहे. पूरग्रस्ताना मदत उशिरा पोहचली असा आरोप केला जातोय. उशिरा म्हणजे काय? लवकर म्हणजे काय? हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही.