Sanjay Raut | लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच होती मग आता… संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut | लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच होती मग आता… संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं

| Updated on: Apr 07, 2026 | 11:52 AM

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप तसेच बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठे विधान केले.

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप तसेच बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठे विधान केले.
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत निवडणूकांचा इतहासच सर्वासमोर काढला. संजय राऊत यांनी म्हटले की, दुःखाच्या काळात आमच्या पवार कुटुंबाविषयी सद्भावना आहेत. मात्र, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अजित पवार यांच्या पक्षाने पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुक लढवलीच होती ना.  लोकशाहीत जर कोणी निवडणूक लढत असेल तर दबाव का आणायचा? शरद पवार यांच्या विचारांशी मी सहमत आहे. काँग्रेसच्या मदतीने त्यावेळी ते पिंपरी चिंचवडची निवडणूक लढले होते. हा अलिकडचाच इतिहास आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि रविंद्र चव्हाण काय स्वतंत्र्यतासैनानी आहेत? ते पाठिंब्यासाठी समजवून सांगायला जाण्याकरिता धमक्या देतात. एकूणच संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे बारातमीतील पोटनिवडणुकीत बरंच काही मोठं घडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Apr 07, 2026 11:52 AM
Follow Us