फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?

फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?

| Updated on: Jul 11, 2026 | 11:25 AM

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदाबाबतही विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर मोठे विधान केले आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयावर भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडवली आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात गेले तर मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे मजबूत दावेदार ठरू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या मते, विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व पक्षांतील नेत्यांशी संवाद ठेवणारे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली जाऊ शकते, महत्त्वाचं म्हणजे गिरीश माहाजन यांचा रेकर्ड खराब आहे त्यांना पद मिळणारच नाही, असा त्यांचा दावा आहे.

याचवेळी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला असून आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 11, 2026 11:23 AM
Follow Us