देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही हे उद्या कळेल- संजय राऊत
सत्ता असो वा नसो शिवसेनेला (Shivsena) फरक पडत नाही असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. याशिवाय देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही हेसुद्धा उद्या कळेल असे ते म्हणाले. शिवसेनेतील प्रत्येक जिल्हा प्रत्येक विभाग मातोश्रीवर येत आहेत आणि उद्धव ठारेंची भेट घेत आहेत. शिवसेना, शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आहे तिथेच […]
सत्ता असो वा नसो शिवसेनेला (Shivsena) फरक पडत नाही असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. याशिवाय देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही हेसुद्धा उद्या कळेल असे ते म्हणाले. शिवसेनेतील प्रत्येक जिल्हा प्रत्येक विभाग मातोश्रीवर येत आहेत आणि उद्धव ठारेंची भेट घेत आहेत. शिवसेना, शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आहे तिथेच आहे असे संजय राऊत म्हणाले. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि मातोश्री आमच्यासाठी आई समान आहे अशा भावना यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. यासोबतच आम्ही आईशी गद्दारी नाही करू शकत असा टोलाही त्यांनी लगावला. आजही लाखो शिवसैनिक आमच्यासोबत आहेत असे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
Published on: Jul 10, 2022 02:41 PM
