Sanjay Raut : निवडणुका कशा आणि कोणबरोबर लढायच्या ते.., पालिका निवडणुकांवर राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut : निवडणुका कशा आणि कोणबरोबर लढायच्या ते.., पालिका निवडणुकांवर राऊतांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 11, 2025 | 11:15 AM

Sanjay Raut PC : मुंबई पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व पक्षांनी कंबर कसलेली आहे. त्यासंदर्भात आज शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राईउत यांनी माहिती दिली.

मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तयारी आम्ही सुरू केली आहे. निवडणुका कशाप्रकारे लढायच्या, कोणबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या की नाही, त्यासंदर्भात पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार मध्यमांशी बोलताना दिली आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी सांगितलं की, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत, त्यावर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्या दृष्टीने तयारी केलेली आहे. काही विषयांवर चर्चा संपलेली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. जर कुठे महाविकास आघाडीत लढणे शक्य नसल्यास, आपण एकटे लढू शकतो का? महाविकास आघाडीत आपल्याला कुठेकुठे लढता येईल? याचा आढावा घेण्यास सांगितला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं राऊत म्हणाले.

Published on: Jun 11, 2025 11:15 AM