Sanjay Raut : पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान केक खाऊन येतात, त्यावर आक्षेप का नाही? राऊतांचा खणखणीत टोला

Sanjay Raut : पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान केक खाऊन येतात, त्यावर आक्षेप का नाही? राऊतांचा खणखणीत टोला

| Updated on: Mar 21, 2025 | 12:38 PM

Sanjay Raut Press Conference : औरंगजेबाची कबर आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

पाकिस्तानात जाऊन आपले प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन आले, त्यावर तुमचा आक्षेप नाही. मग एखाद्या इफ्तार पार्टीमध्ये गेल्यावर तुम्ही आक्षेप का घेता? असा दुजाभाव का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत झालेल्या एका इफ्तार पार्टीमध्ये काही मंत्री सहभागी झाले होते. त्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच संदर्भात आज उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की,  औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला काही पत्र लिहले असेल असे मला वाटत नाही. केंद्र आणि राज्यात त्यांचेच सरकार आणि पोलिस आहेत. बाबरी पाडताना कुणाची परवानगी घेतली नव्हती. कारसेवेला जाताना फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे. त्यांनी तसेच आता बाहेर पडावे. कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला गेले पाहिजे, अशी खोचक टीका राऊत यांनी यावेळी केली.

Published on: Mar 21, 2025 12:38 PM