Sharad Pawar Iftar Party Speech : इफ्तार पार्टीत शरद पवार यांचा Raj Thackeray यांना टोला

| Updated on: Apr 27, 2022 | 9:07 PM

लोकांना बोलवणे आणि दुसऱ्याच क्षणी भाईचार संपेल अशी वक्तव्य करणे हे ठीक नाही

Follow us on

मुंबई : आज मुंबईतील इस्लाम जिमखान्यात रोजा इफ्तार पार्टी (Iftar Party) पार पडली. त्यावेळी राष्ट्रावादीचे अध्यक्ष यांनी रमजानच्या शुभेच्या मुस्लिम धर्मियांना दिल्या. तसेच ते म्हणाले, राज्यावर कोरोनाचे संकट आले होते. त्यामुळे इफ्तार पार्टी करण्यात आली नाही. मात्र याच्या आधी आम्ही या निमित्ताने एकत्र येत होतो. बोलत होतो आणि आनंदाने आपआपल्या घरी जात होतो. आता दोन वर्षानंतर ही संधी पुन्हा मिळाली आणि आम्ही तुम्हाला बोलवलं तुम्ही आलातही त्याबद्दल आपले आभार. तसेच त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला हाणला. यावेळी ते म्हणाले कुणाला सभा घ्यायची असेल तर सरकार परवानगी देणार आहे. पण लोकांना बोलवणे आणि दुसऱ्याच क्षणी भाईचार संपेल अशी वक्तव्य करणे हे ठीक नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ‘लोकांमध्ये, समाजात भांडणे लावणे हे योग्य नसल्याचे म्हणत पवार (President Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.