शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

| Updated on: Jul 15, 2026 | 10:28 AM

राज्यातील राजकारणात काल उशिरा रात्री झालेल्या एका बैठकीमुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

या बैठकीनंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार NDA सोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या 10 आमदारांपैकी 9 आमदारांना ही युती मान्य आहे अशा चर्चा असल्यामुळे अलीकडील जयंत पाटील-तटकरे बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

सध्या राज्याचे अर्थमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, भविष्यात राजकीय समीकरणे बदलल्यास हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ शकते, अशी चर्चा आहे. जयंत पाटील यांना अर्थखात्याचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी ही भेट ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या विषयासंदर्भात घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमके राजकीय कारण होते का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Published on: Jul 15, 2026 10:28 AM
Follow Us