Sharad Pawar : 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, ‘निव्वळ अशक्य’

| Updated on: May 10, 2022 | 12:37 PM

Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याबाबत पवार यांना विचारण्यात आले.

Follow us on

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात राज्यात निवडणुका लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानुषंगाने इच्छूकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी निवडणुकीवरून सुरू असलेल्या अफवांवर भाष्य केलं आहे. येत्या 15 दिवसात निवडणुका (election) होणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या निवडणुका 15 दिवसात का होणार नाहीत? कोर्टाचा नेमका निर्णय काय आणि त्याचा काय अर्थ काय हे सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं. पवारांच्या या विधानामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.