Jyoti Waghmare : कलेक्टरने झापलं…’तो’ व्हिडीओ व्हायरल होताच शिंदेंच्या महिला नेत्याचं स्पष्टीकरण, हा गुन्हा मी…

Jyoti Waghmare : कलेक्टरने झापलं…’तो’ व्हिडीओ व्हायरल होताच शिंदेंच्या महिला नेत्याचं स्पष्टीकरण, हा गुन्हा मी…

| Updated on: Sep 29, 2025 | 4:08 PM

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या व्हायरल फोन कॉलवर ज्योती वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पूरग्रस्तांना वेळेवर जेवण न मिळाल्याने आवाज उठवला, हे राजकारण नसून गोरगरिबांचा आवाज बनणे असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या एका व्हायरल फोन कॉलवरून टीकेला सामोरे जाणाऱ्या शिंदे गट शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी आता या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना वेळेवर मदत मिळत नसल्याने आणि जेवण पोहोचत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा फोन कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी किंवा टक्केवारीसाठी नव्हता, तर शेतकऱ्यांचा आणि पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी होता, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी महोदयांशी बोलताना त्यांनी केवळ साहेब आणि विनंती हे नम्र शब्द वापरल्याचे वाघमारे यांनी सांगितले. राजकारण कोण करत आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवावे, असे आवाहन त्यांनी केले. सिंधखेड, पाकणी, डारफळ, देवगाव आणि करंजा यांसारख्या पूरग्रस्त भागांमध्ये आपण स्वतः पाच-सहा दिवसांपासून मदतीसाठी फिरत असल्याचे आणि पावसात भिजून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. पूरग्रस्तांचा आवाज बनणे हा गुन्हा असेल, तर असे गुन्हे वारंवार करण्याची आपली तयारी असल्याचेही वाघमारे यांनी ठामपणे सांगितले.

Published on: Sep 29, 2025 04:08 PM