Satish Bhosale News : खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Satish Bhosale News : खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: Mar 14, 2025 | 2:24 PM

Shirur Crime News Updates : शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले याला आज शिरूर कोर्टाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 20 तारखेपर्यंत खोक्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.

बीडच्या शिरूरमधील अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला 7  दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सतीश भोसले हा आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. सतीश भोसले याचे काही पैशांचे व्हिडिओ देखील अंजली दमानिया यांनी शेअर केले होते. त्यानंतर त्याच्या अटकेची मागणी जोर धरायला लागली. दोन दिवसांपूर्वी बीड पोलिसांनी खोक्या भोसले याला प्रयागराजमधून अटक केली. त्यानंतर आज त्याला शिरूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील तपासासाठी पोलिसांकडून खोक्याची कोठडी मागण्यात आली होती. ती मान्य करत न्यायालयाने खोक्या उर्फ सतीश भोसले याला 20 मार्चपर्यंत 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Published on: Mar 14, 2025 02:18 PM