Santosh Bangar : ‘बांगर बोलतोय’, डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख… शिवसेनेच्या आमदारानं डॉक्टरलाच धरलं धारेवर, ऐका ऑडिओ

Santosh Bangar : ‘बांगर बोलतोय’, डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख… शिवसेनेच्या आमदारानं डॉक्टरलाच धरलं धारेवर, ऐका ऑडिओ

| Updated on: Apr 12, 2025 | 10:38 AM

छत्रपती संभाजी नगरच्या एम.जी.एम. रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या रुग्णाचं दहा दिवसांचं बिल सहा लाखांपर्यंत गेले आहे. यावरून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळालं. एम.जी.एम.च्या डॉक्टरला बांगरांनी बिलासंदर्भात जबाब विचारला आहे.

हिंगोलीच्या कळमनूरीतल्या यात्रेत दंड थोपटणारे आमदार संतोष बांगर आपण सर्वांनीच पाहिलेत. मात्र आता याच संतोष बांगरांनी अव्वाच्या सव्वा पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध दंड थोपटले. सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या दोन व्हायरल ऑडिओ क्लिप चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. पुण्यातल्या दीनानथ रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरण ताजं असतानाच बांगरांनी मोठ्या प्रमाणात बिल आकारणाऱ्या रुग्णालयांकडे आपला मोर्चा वळवला. डेंगू तापाच्या रुग्णाचं दहा दिवसांचं सहा लाखाचं बिल कसं झालं? रुग्णाला अमृत पाजलं का? असा सवाल करत बांगर रुग्णालयावर चांगलेच संतापले.

संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसोबतच बांगर यांच संभाषण सध्या चांगलच व्हायरल झालाय. ‘हॅलो… डॉक्टर साहेब नमस्कार… हा नमस्कार…. आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. एक आदिती माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो सर ते तीन लाखाचं मेडिकल आणि २ लाख ८५ हजार रुपये तिचं बिल झालंय. एक लाख ८० हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा दिवसाचं म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला कितीपत योग्य आहे? दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात? ‘, असा सवाल करत बांगरांनी डॉक्टरला चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Apr 12, 2025 10:38 AM