Ambadas Danve : बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
Ambadas Danve On Beed Crime : बीडमध्ये एका शिक्षकाने शाळा प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. त्यावर आज शिवसेना वि. प. नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे.
बीडमधल्या नागरगोजे या शिक्षकाने केलेल्या आत्महत्येला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. विना पागरी वेठबिगार तरी बरा अशी या शिक्षकाची स्थिती होती. या संपूर्ण परिस्थितीवर त्याने लिहिलेलं पत्र माध्यमांवर व्हायरल झालं आहे. याला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार आहे, अशी टीका आज शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले की, या प्रकरणी आंदोलन करण्याची भूमिका आम्ही सभागृहाच्या बाहेर घेतली आहे. सभागृहात देखील आम्ही यावर बोलण्याची भूमिका घेऊ. पुण्यात न्यायाधीशाची खोटी सही करून जामीन मिळवल्याचा प्रकार पुढे आला आहे. या आधी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्या जात होत्या. आता जर न्यायाधीशांचीच खोटी सही केली जात असेल तर राज्यात गुन्हेगारी कुठे पोहोचली आहे, याचा आपण विचार केला पाहिजे, असंही यावेळी दानवे म्हणाले.
Published on: Mar 17, 2025 01:26 PM
