Sindhudurg Rain | मालवण तालुक्याला पावसाने झोडपले, मसुरे पंचक्रोशीत पावसाचे थैमान

Sindhudurg Rain | मालवण तालुक्याला पावसाने झोडपले, मसुरे पंचक्रोशीत पावसाचे थैमान

| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 11:30 AM

काल दिवसभर मालवण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासात मालवणात 198 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालवण तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीत तर या पावसाने अक्षरशः थैमान घालत लोकांचे जनजीवन विस्कळीत करुन टाकले होते. गेले तीन दिवस अविश्रांत बरसणाऱ्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून गेले आहेत.

काल दिवसभर मालवण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासात मालवणात 198 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालवण तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीत तर या पावसाने अक्षरशः थैमान घालत लोकांचे जनजीवन विस्कळीत करुन टाकले होते. गेले तीन दिवस अविश्रांत बरसणाऱ्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून गेले आहेत. बुधवारी दिवसभर रमाई नदीची पाण्याची पातळी वाढली होती. मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत येथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा येथील बाजारपेठे नजीक पोचले होते. वडाचापाट गोळवण  मार्गावर वडाचापाट येथे तर पोईप धरणावर पाणी असल्याने हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला होता. गडनदीला सुद्धा पूर आल्याने भगवंतगड कॉजवे पाण्याखाली गेला होता. तसेच पालयेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने बांदिवडेत पोहोचणारे रस्ते बंद झाले होते.सध्या पावसाचा जोर ओसरला असून अधून मधून सरी कोसळत आहेत. | Sindhudurg Rain Update heavy rain fall in Malvan Taluka