Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’साठी सामाजिक अ’न्याय’, इतक्या कोटींचा पुन्हा निधी वळवला
गेल्या महिन्यात सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता परत सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे.
महायुती सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. अशातच लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजित न्याय विभागाचा निधी वळवला असल्याचे समोर आले आहे. सामाजिक न्याय विभागाचा तब्बल ४१० कोटी रूपयांचा निधी वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटी ३० लाखांचा निधी वितरीत करण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाचा आतापर्यंत ८१० कोटी ६० लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. यासह वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा ६ हजार ७६५ कोटी रूपयांचा निधी वळवला जाणार आहे. तर आदिवासी विभागचाही ३३५ कोटी ७० लाखांचा निधी तीन वेळा वळवला आहे.
Published on: Jun 06, 2025 02:02 PM
