Special Report | ईडीकडे जबाब…कोणाचा कोणावर दबाव?

| Updated on: Feb 04, 2022 | 12:00 AM

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब मला आणून द्यायचे. कदाचित परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते माझ्याकडे द्यायचे. पुढे तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती. मात्र त्याचवेळी त्यांना आपण हेही सांगितलं की, जर बदल्या नियमात बसत असेल तर ही प्रक्रिया करा, नाही तर पुढची प्रक्रिया करु नका, असा आरोप देशमुख यांनी केलाय.

Follow us on

ईडीच्या तपासातून रोज एक एक धक्कादायक गौप्यस्फोट होण्यास सुरुवात झालीय आणि आता तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी जो जबाब ईडीला दिलाय, तो एकप्रकारे महाविकास आघाडीतच फटाके लावणारा आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब आणून द्यायचे असा खळबळजनक आरोप, देशमुखांनी केलाय. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब मला आणून द्यायचे. कदाचित परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते माझ्याकडे द्यायचे. पुढे तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती. मात्र त्याचवेळी त्यांना आपण हेही सांगितलं की, जर बदल्या नियमात बसत असेल तर ही प्रक्रिया करा, नाही तर पुढची प्रक्रिया करु नका, असा आरोप देशमुख यांनी केलाय.

देशमुखांच्या याच आरोपांवर, आम्ही अनिल परबांची प्रतिक्रिया जाणून घेतली…मात्र परबांनी अधिक न बोलता योग्यवेळी बोलणार असं म्हटलंय. देशमुखांनी मंत्री परबांचं नाव घेतल्यानंतर, आता भाजपच्या अतुल भातखळकरांनी ट्विट करुन सवाल उपस्थित केलाय. अनिल देशमुख पाठोपाठ राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंनीही आपल्या जबाबातून खळबळ उडवलीय. मुख्यमंत्र्यांनी जुलै 2020 मध्ये मला सांगितलं होतं की त्यांच्याकडे पोलिसांच्या बदल्यांचा बाबतीत काही तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मुंबईतल्या 10 डिसीपींच्या बदल्या पोलीस आयुक्तांना सांगून थांबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मला दिल्या. त्यानंतर मी परमबीर सिंह यांना फोन करुन बदल्या मागे घेण्यास सांगितलं. मात्र त्यानंतरही बदल्यांचे नव्याने आदेश कसे निघाले याची मला कल्पना नव्हती. कदाचित परबमीर सिंह यांचं थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणं बोलणं झालं असावं.