Special Report | दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतला फरक काय?

| Updated on: Jan 12, 2022 | 10:55 PM

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचं आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतील परिस्थितीत जमीन-अस्मानचं अंतर आहे. रुग्णांचे दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेतही हाल होऊ नयेत म्हणून मुबई पुण्यासारख्या शहरात मोठी यंत्रणा उभी राहिली आहे. मात्र वास्तव परिस्थिती म्हणजे 90 टक्के रुग्ण हे अॅडमिटच होत नाहीत किंवा त्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरजच पडत नाही.

Follow us on

काल मुंबईत 11,647 कोरोना रुग्ण आढळून आले, त्यातील केवळ 851 रुग्ण रुग्णालयात भर्ती झाले. दुसऱ्या लाटेवेळी जेव्हा मुंबईत दिवसाला 11 हजार रुग्ण आढळून येत होते, तेव्हा दिवसाला 5 हजार रुग्ण रुग्णालयात भर्ती होत होते. तर पुण्यात काल 3,459 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, त्यातील केवळ 20 रुग्ण दवाखान्यात अॅडमिट झाले. दुसऱ्या लाटेत जेव्हा पुण्यात दिवसाला 3 हजार रुग्ण मिळायचे, तेव्हा त्यातील तब्बल अडीच हजार रुग्णांना रुग्णालयात भर्ती करण्याची वेळ येत होती.