Special Report | शीतल म्हात्रेंचा शिंदे गटाकडे यु टर्न कसा?-tv9

Special Report | शीतल म्हात्रेंचा शिंदे गटाकडे यु टर्न कसा?-tv9

| Updated on: Jul 13, 2022 | 10:15 PM

म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप असून त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. 8 जुलै रोजी शीतल म्हात्रेंवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटकही होऊ शकते अशी चर्चा होती.

आठवड्याआधी ज्या शिंदे गटालाच दांड्यानं सरळ करणार असा इशारा शीतल म्हात्रे देत होत्या. त्याच शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिंदे गटात सहभागी झाल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच उपस्थितीत, ठाकरेंच्या शिवसेनेतून शीतल म्हात्रे शिंदे गटात आल्यात. शिवसेना तर शीतल म्हात्रेंना अग्नीकन्या म्हणत होती. राऊतांच्या भाषेत फायर. तर ज्या प्रकारे नेते शिंदे गटात जात आहेत, त्यामागे ईडीचा धाक असल्याचा आरोप शिवसेनेच्या अनिल परबांनी केलाय. गुन्हे दाखल असल्यानं, लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याचा आरोप परबांचा आहे…आणि शीतल म्हात्रेंचा शिंदेच्या गटातल्या प्रवेशानंतर, सोशल माडियात 8 जुलैच्या घटनेची चर्चा सुरु झालीय. शीतल म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर 22 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप असून त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. 8 जुलै रोजी शीतल म्हात्रेंवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटकही होऊ शकते अशी चर्चा होती.

Published on: Jul 13, 2022 10:15 PM