Special Report | शिंदे गट, भाजपकडून कोण होणार मंत्री?-tv9
गंभीर आरोप झालेल्या आमदारांना, क्लीनचिट मिळेपर्यंत मंत्री केलं जाणार नसल्याचीही माहितीही सूत्रांकडून मिळालीय, वरिष्ठांबरोबरच नव्या चेहऱ्यांना भाजपकडून संधी मिळणार असल्याचंही कळतंय.
अखेर मुहूर्त ठरलाय, 19 जुलैला शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. 18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळं 19 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलीय. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा शपथिविधी होऊन आता 15 दिवस होतील..मात्र नव्या मंत्र्यांचा शपथविधी अजून वेटिंगवरच आहे. शिंदे गट आणि भाजपमधील मंत्रिपदाच्या वाटपाचं सूत्र जवळपास ठरलेलं आहे. शिंदे गटाला कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे एकूण 13 मंत्रिपदं मिळू शकतात. तर भाजपच्या वाट्याला 30 मंत्रिपदं येऊ शकतात. विधान परिषदेतल्या आमदारांऐवजी लोकांमधून निवडून आलेल्या विधानसभेच्या आमदारांना अधिक संधी मिळणार असल्याचं कळतंय. गंभीर आरोप झालेल्या आमदारांना, क्लीनचिट मिळेपर्यंत मंत्री केलं जाणार नसल्याचीही माहितीही सूत्रांकडून मिळालीय, वरिष्ठांबरोबरच नव्या चेहऱ्यांना भाजपकडून संधी मिळणार असल्याचंही कळतंय.
