खासदार संजय राऊत यांची गोठलेल्या चिन्हावर प्रतिक्रीया पहा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये

खासदार संजय राऊत यांची गोठलेल्या चिन्हावर प्रतिक्रीया पहा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये

| Updated on: Oct 10, 2022 | 5:41 PM

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरंगात असलेले खासदार संजय राऊत यांनी गोठलेल्या चिन्हावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी नवं चिन्ह हे सेनेसाठी क्रांतिकारक ठरेल असे म्हटलं आहे.

राज्यात सत्ता संघर्षानंतर आता शिवसेनेत आणि शिंदे गटात संघर्ष पहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटाने देखिल केला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेलं. यानंतर सर्व कागद पत्रं शिंदे गटासह उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे सादर केली त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना हे नावच आयोगानं अंधेरी पोट निवडणुकीसाठी गोठवलं. यानंतर दोन्ही गटांना दुसरे चिन्ह आणि नाव घेण्याचे आदेश आयोगाने दिले. यानंतर ठाकरे गटाकडून चिन्ह आणि नाव सुचविण्यात आली होती. यावरही आता संघर्ष होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाने जी चिन्ह आणि नाव सुचवली आहेत. त्याच चिन्ह आणि नावांवर शिंदे गटाने आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे. ठाकरेंसह शिंदे गटाच्या निवडणूक चिन्ह आणि नावावर आयोग आपला निर्णय आज देऊ शकतो. तसेच दोन्ही गटांना पर्याय ही देऊ शकतो. तर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरंगात असलेले खासदार संजय राऊत यांनी गोठलेल्या चिन्हावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी नवं चिन्ह हे सेनेसाठी क्रांतिकारक ठरेल असे म्हटलं आहे. तर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठावल्यावरून ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

Published on: Oct 10, 2022 02:49 PM