Shivsena News : शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी, सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना दिलासा
शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबद्दलची आजची सुनावणी आता पूर्ण झालेली असून यात महत्वपूर्ण निर्णय झाला आहे.
शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबद्दलची आजची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे. आता या संदर्भात ऑगस्टमधली तारीख दिली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. पुढच्या एक ते दोन दिवसात या संदर्भातली तारीख देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर अगदी वर्षाच्या अखेरपर्यंत यावर निर्णय येऊ शकतो असं सुप्रीम कोर्टातल्या वकिलांनी म्हंटलं आहे. ऑगस्टमध्ये जर यावर सुनावणी झाली तर त्यानंतर यावर जजमेंट रेकॉर्ड केलं जाईल आणि वर्ष अखेरपर्यंत यावर ठोस निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पक्ष आणि चिन्हाबाबत आजच सुनावणी घ्या अशी मागणी ठाकरेंचे वकील सिब्बल यांनी कोर्टात केली होती. निवडणुका येत आहेत, आजच सुनावणी घ्या असंही वकिलांनी म्हंटलं होतं. तर आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं.
Published on: Jul 14, 2025 01:10 PM
