धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्…

| Updated on: Apr 21, 2024 | 12:56 PM

धनगर आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वार-पलटवार सुरू झालेत. विरोधक याच धनगर आरक्षणावरून भाजपने दिलेल्या वायद्याचं काय झालं? असा सवाल करत हल्लाबोल करताय.

Follow us on

मुंबई उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयातही धनगर आरक्षणाला फटका बसला. धनगर आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वार-पलटवार सुरू झालेत. विरोधक याच धनगर आरक्षणावरून भाजपने दिलेल्या वायद्याचं काय झालं? असा सवाल करत हल्लाबोल करताय. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी धनगर आरक्षणाविरोधात राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचा भाग असलेल्या वनवासी कल्याण संस्थेनेच याचिका केल्याचा आरोप केलाय. धनगर समाजाला महाराष्ट्रात एनटी प्रवर्गातून साडे तीन टक्के आरक्षण आहे. मात्र आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी धनगरांची मागणी आहे. केंद्र सरकराच्या सूचीमध्ये धनगड समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळतं. पण धनगर आणि धनगड हे समाज एकच आहेत का? या मुद्द्यावरून पेच निर्माण झालाय. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने धनगर समाजाला आरक्षणाचा वायदा दिला होता. बघा यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट….