Murlidhar Mohol | पुण्याबाबत तातडीने निर्णय घ्या, महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी
राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे शहरातील लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे : मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमन दिलं आहे, त्यासंदर्भातला लवकर आदेश काढावेत. शहरात शिथिलता देण्यासंदर्भात मी गेल्या 15 दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करतोय, मात्र त्यावर निर्णय का नाही माहीत नाही. पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांच्या खाली आहे, त्यामुळे शहर लेव्हल 2 मध्ये आहे, तरी शिथिलता दिली जात नाहीये. राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे शहरातील लसीकरण गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
