Teachers Recruitment : बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
Nagpur Teachers Recruitment Fraud : नागपुरमधील तब्बल 580 शिक्षकांच्या भरती घोटाळ्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या निलेश मेश्राम याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्वाची ऑडिओ क्लिप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या निलेश मेश्रामची ही ऑडिओ क्लिप आहे. सध्या ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये बोंग शिक्षकभरती प्रक्रियेतील कागदपत्रांसंबंधित उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही.
नागपुरमधील तब्बल 580 शिक्षकांच्या भरती घोटाळ्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सोबतच या बोगस नियुक्ती आणि वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले असून खुद्द शिक्षण विभागाने हे त्यांच्या एका आदेशात मान्य केले आहे. याच प्रकरणी ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
Published on: Apr 15, 2025 10:24 AM
