Amba Ghat | आंबा घाटात दरड कोसळली, दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत
दोन तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ढिगारा बाजूला हटवल्यानंतर चार चाकी लहान गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात आज पुन्हा दरड कोसळली. दुपारच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दोन तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ढिगारा बाजूला हटवल्यानंतर चार चाकी लहान गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
